व्याख्यानमाला-१९८७

Vyakhyanmala 1986
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

 वर्ष पंधरावे १९८७

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत सन १९८७ मधील साहेबांच्या जयंतीदिनी, महाराष्ट्राच्या तरूण पिढीतील एक व्यासंगी व थोर विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, संगमनेर यांनी ‘ धर्म आणि इतिहास लेकन’  या विषयावर दोन प्रभावी व्याख्याने दिली आणि त्या विषयासंबंधीचे आपले सुस्पष्ट व परखड विचार कराडकरांना ऐकविले. त्याबद्दल आम्ही डॉ. कसबे यांचे आभारी आहोत.

आदरणीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी चालविलेले समाज प्रबोधनाचे व परिवर्तनाचे कार्य सतत तेवत रहावे या जाणिवेने १९७३ साली ‘ यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला ’ सुरू करण्यात आली. पुढे काही सज्जनांच्या सूचनेवरून व्याख्यानमालेतील अभ्यासपूर्ण व्याख्याने पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ लागली. ही व्याख्यानमाला याही पुढे अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा आणि त्यातील निवडक व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिध्द करीत रहाण्याचा मनोद्य आहे.

डॉ. कसबे यांचे ‘ धर्म आणि इतिहास लेखन ’ व्याख्यानांचे हे पुस्तक लोकमान्य मुद्रणालयाचे संचालक श्री. गजानन गिजरे आणि त्यांचे कुशल व मेहनती कामगार यांनी वेळेवर तसेच सुबकपणे छापून दिले, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने जयंतीदिनी ज्यांच्या संबंधी ‘ उदंड आयुरारोग्य लाभो ’ अशी करूणा भाकावयाची ते सर्वांचे प्रिय यशवंतरावजी आज आपल्यात नाहीत, सर्वसामान्याविषयी अखंड आत्मियता बाळगणारा सर्वगुणसंपन्न नेता कृष्णाकाठी कायमचा विसावला !  त्यांच्याच पवित्र स्मृतीला हे पुष्प सादर समर्पण  !!