यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार

Yashwantrao Chavan Yanche Maulik Vichar
यशवंतराव चव्हाण

यांचे मौलिक विचार

संकलन : श्री. ना. धो. महानोर
--------------------------------

pdf inmg  Ebook साठी येथे क्लिक करा

कै. यशवंतराव  चव्हाण  यांचे काही मौलिक विचार या पुस्तिकेद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे प्रकाशित करताना आम्हाला आनंद वाटतो. कै यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आचार-विचार-उच्चाराने आणि कार्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अवघ्या देशाच्या पातळीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशिष्ट ठसा उमटविला आहे.

कै. यशवंतराव चव्हाणांनी प्रसंगानुरूप केलेली व्याख्याने आणि लिहिलेले लेख बहुतांशी ग्रंथबध्द झालेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्तवाचा आणि विचारांचा ज्यांना खोलवर अभ्यास करावयाचा असेल त्यांनी मुळात त्यांचे ग्रंथ वाचणे श्रेयस्कर ठरेल. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांसंबधी यशवंतरावांनी वेळोवेळी प्रगट केलेल्या विचारंच्या  अथांग सागरातून मौलिक मोती शोधण्याचे अवघड काम श्री. ना. धों. महानोर यांनी आस्थेने केले आहे; ते अधिकाधिक सर्वस्पर्शी होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आहे. प्रतिष्ठान त्यांचे आभारी आहे.

सर्वसामान्य वाचकाला आणि कार्यकर्त्याला, ही पुस्तिका सहज उपलब्ध व्हावी आणि संग्रही ठेवता यावी या हेतूने, पुस्तिकेचे स्वरूप लहान आणि किंमत कमी ठेवलेली आहे. वाचक आणि कार्यकर्ते या पुस्तिकेचे आवडीने स्वागत करतील अशी आशा वाटते.