१९१३ - १२ मार्च
जन्म सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी. ( कृष्णाकाठ - आत्मचरित्र या ग्रंथातून)
१९१८ - १९
वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत व नंतर कर्‍हाड येथे शिक्षणासाठी दाखल.
१९२७
कराडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश.
१९२९ - ८ एप्रिल
भगतसिंगांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला त्या घटनेने राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि भगतसिंगांच्या फाशीनंतर स्वातंत्र्य लढयाला आयुष्य वाहून टाकायचा निर्धार.
१९३० - ३१
सालच्या मध्यापर्यंत जवळजवळ दीड वर्ष, ज्ञानप्रकाश,वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून संपर्क.
१९३० - ३३
असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहभाग व १९३२, १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
१९३३- मे
तुरुंगातून सुटका.
१९३१
पुणे येथील (नूतन मराठी विद्यालया) तर्फे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत 'ग्रामसुधारणा' या विषयावर पहिल्या क्रमांकाचे रुपये १५० - ०० (दीडशे) चे पारितोषिक प्राप्त.
१९३४
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश. (प्राचार्य डॉ. बाळकृष्ण व प्रोफेसर ना.सी. फडके यांचा सहवास व मार्गदर्शन).
१९३५
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य.
१९३८
इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण, पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश.
१९३६ ते १९३८
एम.एन.रॉय यांच्या विचाराचा प्रभाव (रॉयवादी विचारसरणीच्या छायेत. )
१९४०
सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष.
१९४१
ऑगस्ट, एल.एल.बी.परीक्षेत सुयश व वकिलीच्या व्यवसायात प्रारंभ.
१९४१
कर्‍हाड येथे भरलेल्या (दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनातील) परिसंवादाचे अध्यक्ष. विषय : बहुजन समाज आणि साहित्य.
१९४२
जून २, कराड येथे वेणूताईंशी विवाहबद्ध ( फलटण येथील मोरे कुटुंबातील कन्या)
१९४२
ऑगस्ट ९, चळवळीस प्रारंभ, विशाल सातारा जिल्हा नेतृत्व, म. गांधीच्या 'चले जाव' घोषणेत आणि भूमिगत, 'भारत छोडो' चळवळीत अटक.
१९४२ - ४३
सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत प्रवेश, संचालन, मार्गदर्शन.
१९४३
सर्वांत थोरले बंधू ज्ञानोबा यांचे निधन.
१९४४
राजकीय क्रांती या विषयावर कविता (तुरुंगवास).
१९४५
तुरुंगातून सुटका.
१९४६
मुंबई इलाखा कायदे मंडळाच्या निवडणुकीत द. सातारा मतदारसंघातून निवड.
१९४६
एप्रिल १४, गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड.
१९४७
डिसेंबर १५, मध्ये बंधू गणपतराव यांचे निधन.
१९४८
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस.
१९५१
मधले बंधू गणपतराव यांच्या पत्‍नीचे निधन.
१९५२
कर्‍हाड मतदारसंघातून विधानसभेवर निवड व नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती.
१९५३
सप्टेंबर २८, श्री. भाऊसाहेब हिरे व श्री. नानासाहेब कुंटे यांच्या समवेत नागपूर करारावर पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने स्वाक्षरी.
१९५४
मुंबई राज्य पंचायत संघाची स्थापना.
१९५५
ऑक्टोबर १०, राज्य पुनर्रचना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. विदर्भाचे वेगळे राज्य व उर्वरित मराठी प्रदेश व गुजराथी प्रदेश यांचे संयुक्त राज्य सुचविणारी शिफारस.
१९५५
डिसेंबर१, फलटण येथे (सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या) सभेत ''उपोषण, संप, राजीनामे हे संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याचे मार्ग नव्हेत'' असे ठासून प्रतिपादन करणारा ठराव मंजूर, महाराष्ट्रपेक्षा नेहरु श्रेष्ठ, आणि ''मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याच्या प्रयत्‍नांत यापुढे श्री. शंकरराव देव यांचे नेतृत्व स्वीकारावयास मी तयार नाही'' अशी श्री. चव्हाण यांची घोषणा.
१९५६
ऑक्टोबर, लोकसभेत विदर्भासह विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्याच्या बाजूने आपला कौल दिला.
१९५६ - नोव्हेंबर १
विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना व द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड (वय ४३).
१९५७
एप्रिल, मुंबई विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्‍हाड येथे अटीतटीचा सामना होऊन विजय आणि पुनश्च मुख्यमंत्रीपद ( वय ४४)
१९५७
नोव्हेंबर ३०, प्रतापगडावर शिवस्मारकाचे पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उद्‍घाटन, द्विभाषिक विरोधी मोर्चा व समारंभ शांततेने पार पडले.
१९५८
सप्टेंबर, (अखिल भारतीय काँग्रेसच्या) वर्किंग कमिटीवर निवड.
१९५८
फेब्रुवारी, विसाव्या (विदर्भ साहित्य) संमेलनाचे उद्‍घाटन.
१९५८
डिसेंबर, सीमाप्रश्नाची दाद मागण्यासाठी भारताच्या राजधानीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने सत्याग्रह
१९५९
जानेवारी, अ.भा.काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात तृतीय पंचवार्षिक योजनेविषयीचा ठराव मांडला.
१९५९
मार्च, शस्त्रक्रिया व बेचाळीस दिवसांची विश्रांती
१९५९
ऑगस्ट, द्विभाषिक राज्याचा कारभार यशस्वी होत असता तरी राज्यातील जनतेत एकात्मतेची भावना निर्माण झालेली नाही. म्हणून मुख्यमंत्री या नात्याने ते मी यापुढे चालवू शकणार नाही, असा निर्णय घेऊन ती काँग्रेस श्रेष्ठींना कळविला.
१९५९
सप्टेंबर, द्विभाषिक मुंबई राज्याच्या पुनर्रचनेसंबंधी विचार करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीने नऊ सदस्यांची समिती नेमली.
१९५९
डिसेंबर २९, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, अलिगढ - ऑनररी डिग्री ऑफ एल.एल.डी.पदवी.
१९६०
जानेवारी, द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करुन मुंबईसह मराठी प्रदेशाचे व गुजरात प्रदेशाचे अशी दोन राज्ये निर्माण करण्याचा निर्णय नऊ सदस्यीय समितीने घेतला.
१९६०
फेबुवारी १३ (सावरगाव- डुकरे) येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन.
१९६०
मार्च, बारामती येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देऊन, महाराष्ट्र राज्याची निर्मिती लोकशाही पद्धतीने व शांततेने करण्याच्या प्रयत्‍नावर मराठी जनतेने विश्वास व्यक्त केला.
१९६०
एप्रिल, लोकसभेने द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करुन मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब केले.
१९६०
मे १, महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरणात स्थापना, व नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी (वय ४६)
१९६०
जून, पुणे येथे. पं. गोविंदवल्लभ पंत यांच्या उपस्थितीत म्हैसूरचे मुख्यमंत्री श्री. जत्ती यांनी सीमेचा प्रश्न वादविषय असल्याचे मान्य केले. श्री. चव्हाण व श्री जत्ती यांचे सीमा प्रश्नांचा विचार करण्यासाठी व आपापल्या सरकारांनी रिपोर्ट सादर करण्यासाठी प्रत्येकी दोन प्रतिनिधी मिळून चार सदस्यांची नेमणूक करण्यात येईल, अशी घोषणा करणारे संयुक्त पत्रक.
१९६०
ऑक्टोबर २१, पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर सत्कार
१९६०
नोव्हेंबर, अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.
१९६०
नोव्हेंबर १०, नागपूर करार अंमलबजावणीचा भाग म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरात दरवर्षी भरविण्यात सुरुवात.
१९६०
डिसेंबर २१, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना व नागपूर येथे मंडळाचे उद्‍घाटन.
१९६०
डिसेंबर, मुंबई येथे शिवछत्रपतींच्या पुतळयाचे अनावरण.
१९६१
जानेवारी, काँग्रेस महासमितीमधून निवडणूक पद्धतीने प्रथमच झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड.
१९६१
दिल्ली येथे भरलेल्या ४३ व्या अ.भा.मराठी नाटय संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
१९६१
मार्च ३०, विदर्भातील जनतेच्या वतीने नागपूर येथे ४७ व्या वाढविदसानिमित्त सत्कार समारंभ.
१९६२
मे १, पंचायत राज्य योजनेचा प्रारंभ.
१९६२
सातारा येथे भरलेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे उद्‍घाटक.
१९६२
फेब्रुवारी, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, काँग्रेसने २६५ पैकी २१४ जागा जिंकून प्रचंड विजय मिळविला.
१९६२
ऑक्टोबर, 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'नियतीचा हात' हा पहिला लेख प्रसिद्ध.
१९६२
ऑक्टोबर, 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'नियतीचा हात' हा पहिला लेख प्रसिद्ध.
१९६२
नोव्हेंबर २२, भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.
१९६३
नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.
१९६३
अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मॅक्नोरा यांच्या निमंत्रणावरुन अमेरिकेस भेट.
१९६३
ऑगस्ट, रशियाचा दौरा - रशियन पंतप्रधान क्रुश्चेव्ह यांच्याशी चर्चा, मदतीचे आश्वासन.
१९६४
ऑगस्ट २८, रशियाचा दौरा.
१९६४
दिल्लीतील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
१९६५
जानेवारी, नांदेड येथे भरलेल्या ४७ व्या अ.भा.म.नाटय परिषद - अधिवेशनाचे उद्‍घाटक
१९६५
ऑगस्ट १८, आई विठामाता यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन - मुंबई .
१९६६
जानेवारी, ताश्कंद येथे शास्त्रीजी - आयुबखान चर्चेस उपस्थित (कोसिजिन यांच्या प्रयत्‍नानुसार)
१९६६
नोव्हेंबर १४, केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती.
१९६७
गृहमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांतच नव्याने दहा राज्यपालांची नियुक्ती.
१९६९
नोव्हेंबर, बंगलोर काँग्रेस अधिवेशनानंतर काँग्रेस पक्ष दुभंगला गेला.
१९६९
फेब्रुवारी २३, कानपूर विश्व विद्यालयाने 'डॉक्टर ऑफ लॉ' सन्मानपूर्वक बहाल.
१९७०
जून २६ केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७०
फेब्रुवारी १०, औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.
१९७१
विकसनशील राष्ट्र परिषदेमध्ये आर्थिक विकासासंबंधी चर्चा.
१९७२
सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड, लोकसभेच्या ४३ जागा जिंकल्या (महाराष्ट्रात).
१९७४
डिसेंबर १, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.
१९७५
ऑक्टोबर, केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७५
गियाना, क्युबा, लेबेनॉन, इजिप्त, पेरु, अमेरिका, अफगाणिस्तान, इराक, कुवेत व फ्रान्स इत्यादी राष्ट्रांना भेटी.
१९७५
डिसेंबर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कर्‍हाड येथे भरलेले होते. त्याचे स्वागताध्यक्षपद.
१९७६
जानेवारी १७, परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी.
१९७६
तुर्कस्थान, अल्जेरिया या देशांना भेटी.
१९७६
ऑक्टोबर ८, सदिच्छा राजदूत म्हणून अमेरिकेतील होस्टन येथील टेक्सास शहरातर्फे मानपत्र.
१९७७ - ७८
लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून निवड (मान्यताप्राप्त अशा विरोधी पक्षाचे लोकसभेतील स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिले विरोधी पक्षनेते).
१९७८
इंदिरा गांधी यांच्याबरोबर मतभेद होऊन संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश.
१९७८ -
महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 'पुलोद' मंत्रिमंडळ स्थापन. (यशवंतरावांचा 'पुलोद' ला पाठिंबा असल्याचा गवगवा)
१९७९
जुलै, चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री.
१९८०
सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड (रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव विजयी उमेदवार)
१९८२
इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश.
१९८२
आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.
१९८३
जून १, पत्‍नी सौ. वेणूताई यांचे निधन.
१९८३
ऑक्टोबर ७, यशवंतरावांनी आपले इच्छापत्र (वुईल) लिहिले.
१९८४
जानेवारी ९, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक. प.चॅ.ट्रस्टची स्थापना व नोंदणी.
१९८४
फेब्रुवारी ७, 'कृष्णकाठ' आत्मचरित्र : खंड १ ला प्रकाशित.
१९८४
मार्च २४, पुणे विद्यापीठाची सन्मानीय डी.लिट. पदवी बहाल.
१९८४
जून १, सौ. वेणूताईंची प्रथम पुण्यतिथी, त्या दिवशी यशवंतरावांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत सौ. वेणूताई स्मारकाचे भूमिपूजन केले.
१९८४
ऑक्टोबर ७, 'कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मचरित्र ग्रंथास 'केसरी मराठा संस्थेतर्फे' साहित्यसम्राट न.चिं केळकर पारितोषिक.
१९८४
नोव्हेंबर २५, सायंकाळी ७.४५ वाजता दिल्ली येथे निधन.
१९८४
नोव्हेंबर २७, दुपारी ३.४० वाजता कर्‍हाड येथे कृष्णा - कोयनेच्या प्रीतीसंगमावर अत्यंसंस्कार.
१९८६
मे. ३१ क्षेत्र माहुली, जि. सातारा येथील रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'सामाजिक न्याय पुरस्कार' (मरणोत्तर).

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com