साहेब यशवंतरावजी चव्हाण

साहेब यशवंतरावजी चव्हाण

Saheb 14
साहेब

यशवंतरावजी चव्हाण

लेखक : रंगनाथ कुलकर्णी
---------------------------------

pdf inmg  Ebook साठी येथे क्लिक करा

प्रस्तुतकर्त्याचे  चार  शब्द

१२ मार्च १९९१ रोजी कै. यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त मुंबईला के. सी. कॉलेजमध्ये प्रतिष्ठानतर्फे ७००-८०० मान्यवर उपस्थितांसमोर ‘साहेब’ चा पहिला प्रयोग मी सादर केला.

त्यानंतर १९९१ च्या गणेशोत्सवात ३ प्रयोग केले. सोलापूरच्या ‘शहीद स्मारक’ नाटयगृहात, मालेगाव वाचनालयातर्फे, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबई इचलकरंजीच्या नाईट कॉलेजसाठी, पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार-कर्मचा-यांसमोर, वसईला फादर मायकेल गोन्साल्विस यांच्या निमंत्रणावरून ठिकठिकाणी ‘साहेब’ चे प्रयोग झाले.

प्रतिष्ठानतर्फे २५ नोव्हेंबर १९९१ ला कराड येथे स्मृतिसदनात आणि ८ जानेवारी १९९२ ला मुंबईच्या आलिशान केंद्रातही प्रयोग झाले.
राजकीय नेत्यांना निवडणुका, गट-वर्चस्ववादी राजकारणामुळे येणारे कार्यबाहुल्य आणि सामान्य जनात गंभीर-प्रकृती प्रबोधनशील कार्यक्रमांविषयाची उदासीनता वगैरेमुळे २ वर्षात २५ प्रयोग करीन ही माझी जिद्द पूर्ण होऊ शकली नाही.

मात्र,’’व्यक्तिगत राजकारणात कोण चढला, कोण पडला यापेक्षा देश पुढं गेला पाहिजे,’’ ह्या थोरल्या साहेबाच्या धारणेवर लुब्ध होऊन मी, माझी पत्नी सौ. वसुमती आणि मुलगा नितीन यांच्या आग्रहावरून हा प्रयोग उभा केला. या प्रयोगाने मला दोन वर्षे खूपच आनंद दिला, समाधान दिले.


प्राचार्य पी. बी. पाटील, कराडचे पी. डी. पाटील, दादासाहेब रूपवते, अण्णासाहेब शिंदे, सोलापूरचे दिकोंडा, नगरचे मधुकर कात्रे, मोहन धारिया प्रभृतींच्या प्रोत्साहनाने मला हे प्रयोग करता आले.
आता साहेबांच्या १० व्या स्मृतीदिनी प्रयोगाची संहिता पुस्तकरूपाने प्रसिध्द होत आहे, याचा मला आनंद आहे.

‘एकपात्री’ चे दालन अधिक समृध्द करण्याचे भाग्य ‘साहेब’ मुळे मला लाभले..... बाकी ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे!’ या भवभूतीच्या विख्यात उक्तीवर संपूर्ण श्रद्धा असलेला-
आपला नम्र,

रंगनाथ कुलकर्णी
२५ नोव्हेंबर १९९४

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org